कोलाजमध्ये साकारल्या सावित्रीबाई फुले; `थ्री-डी रांगोळी`चाही ठसा... 

कोलाजमध्ये साकारल्या सावित्रीबाई फुले; `थ्री-डी रांगोळी`चाही ठसा... 
Updated on

सासवड - आपल्या कमर्शियल जी. डी. आर्टसच्या जोरावर व अभ्यासपूर्ण कल्पनाशक्तीने आगळ्या `रांगोळी`चा ठसा उमटविणारे.. सासवड (ता. पुरंदर) येथील सोमनाथ भोंगळे यांनी कोलाज प्रकारातील चित्रशैलीद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा साकारली आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी अगदी कऱहा नदीकाठनजिक कन्या प्रशालेच्या प्रांगणात या चित्राचे काम सुरु केले., ते काल ता. 4 दुपारी पूर्ण झाले.  

सासवडच्या नगरसेविका व सोमनाथ भोंगळे यांच्या पत्नी सीमा भोंगळे यांनी या चित्रासाठी आग्रह धरला व त्यासाठी सौजन्य म्हणून सहकार्यही केले. या परिसरात साकारलेले हे 25 फुट रुंदीचे व 30 फुट उंचीचे कोलाज चित्र प्रथमच एवढे मोठे साकारले आहे. ते सर्वांना पाहण्यासाठी पुढील आठवडाभर शाळेच्या वेळात खुले आहे. कोरानाचे नियम पाळणे मात्र सर्वांना बंधनकारक आहे., असे श्री. भोंगळे यांनी स्पष्ट केले. कोलाज प्रकारातील या सावित्रीबाईंच्या चित्रासाठी 15 किलो वर्तमानपत्रे लागली. तर ती पेविंग ब्लाॅकच्या प्रांगणात चिकटविण्यासाठी 15 किलो खळ (पेस्ट) लागली. काही बाबी हायलाईट करण्यासाठी ड्राईंग पेपर वापरला. या चित्र साकारण्यात सोमनाथ भोंगळे यांनी मयूर दुधाळ, अभिषेक शिंदे, पायल गिरमे, अविष्कार भोंगळे, मयुरी गिरमे, रिया भोंगळे, प्रेम गिरमे आदींनी दोन दिवस मदत केली. काल चित्र पूर्ण झाल्यानंतर कन्या प्रशालेतील शिक्षक व विद्यीर्थीनींनी पुष्प पाकळ्या अर्पण करुन आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने श्री. भोंगळे यांनी सांगितले की., नीरा नदीच्या खोऱयातील पळशी नायगावच्या नेवसे - पाटलांचे सावित्रीबाईंचे माहेर.. तर महात्मा जोतिबा फुले यांचे मुळगाव खानवडी हे कऱहा नदीच्या खोऱयात आहे. त्यामुळे कऱहेकाठी त्यांचे कोलाज चित्र साकारताना मला मनस्वी आनंद झाला. चित्र खुपच मोठे असल्याने दोन दिवस मेहनत घ्यावी लागली. 

 `थ्री - डी रांगोळी`चाही ठसा... 
विविध सण - उत्सव आणि सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमात आपण रांगोळी काढतो. पण सासवडचे सोमनाथ भोंगळे यांनी अभ्यासपूर्ण कल्पनाशक्तीने आगळ्या त्रिमीती पद्धतीच्या `थ्री - डी रंगोळी`चाही ठसा पुणे शहर व जिल्ह्यात पूर्वीच उमटविला होता. गेली दोन वर्षे तर राज्याच्या सीमा अोलांडून त्यांची ही कला बाहेरही भुरळ घालत आहे.  गरीबीतून कमवा शिका पध्दतीने शिक्षण घेत.. पेटींग, एटीडी पासून जी. डी. आर्टस पर्यंत सोमनाथ शिकले. मग बोर्ड रंगविणे, शाळांच्या भिंती कार्टून चित्रांनी बोलक्या करणे व रांगोळीत कौशल्य दाखवित रोजी रोटीचा प्रश्न संपविला. रांगोळीतून अमिताभ बच्चनच्या व्यक्तीचित्र रंगावली दर्शनाचा प्रयोग तर खुप गाजला. लोकांची सण - उत्सव आणि सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमांची रांगोळीचे कामे ते सहजतेने पार पाडतात.  सोमनाथ यांनी `थ्री - डी रंगोळी`व्दारे धमाल उडवून दिली आहे. अगदी एखादी व्यक्ती, वस्तु, चित्र `थ्री - डी` रांगोळीतील रचनात्मक व छाया - प्रकाशव्दारेचा इफेक्ट साधत त्रीमिती दर्शनाचा अभासच निर्माण करते. त्यामुळे त्यांच्या या रांगोळीला मुल्य आले आहे. भक्तीरंगात व लोकरंगात रंगणारे पुरंदर आज सोमनाथ यांच्या रंगावलीमध्ये रंगतेय. थ्री डी रांगोळीतील नव्या कलेची गवसणीमुळे रोज कुठेना कुठे ते रंग भरायला जातातच. ठिबक्यांची मांडणी अन् रंगांची दिलजमाई ते इतकी बेमालुम करतात की, रांगोळी नव्हे ते कॅमेऱयाने काढलेले रंगीत छायाचित्रच वाटते. छोट्यापासून ते 15 हजार चौ.फुटांपर्यंत त्यांनी सहकाऱयांसह रांगोळ्या साकारल्या आहेत.   

बच्चनकडून कौतुक व पुरस्कारही.. 
सुपरस्टार अमिताब बच्चन यांच्या चित्रपटातील प्रसंगावर काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो थेट बच्चनपर्यंत पोचल्यावर.. बच्चनजींनी हे फोटो ट्युटरच्या ब्लाॅगवर ठेवून सोमनाथ भोंगळेचा उल्लेख करुन कौतुक केले होते. शिवाय भेटण्याच्याही इच्छा दर्शविली होती. लवकरच ही भेटही होणार आहे., असे सोमनाथ यांनी सकाळ ला सांगितले.

भारत सरकारअंतर्गत लाईफस्टाईल इन्शुरन्सच्या उद्घाटनानिमित्त.. कोल्हापूरच्या भारतीय हूमेनिटी अॅकेडमिक रिसर्च ट्रेनिंग इंस्टिट्युट फाॅर युथतर्फे पणजी (गोवा) येथे कला व सांस्कृतिक भवनात राष्ट्रीय पुरस्कार वितरण दिड वर्षांपूर्वी झाले. त्यात तेथील कला संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळनकर यांच्या हस्ते सासवडच्या सोमनाथ भोंगळे यांना `आयडीयल थ्री - डी रंगोली आर्टीस्ट` या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com